सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या, बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपक केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या अभिष्टचिंतन सोहळ्याकडे संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याला शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, विविध सेलचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संजू परब यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसेवेच्या वाटचालीला शुभेच्छांचे बळ देण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे अभिष्टचिंतन करावे, असे आवाहन सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शुभेच्छांचा वर्षाव… शिवसैनिकांचा उत्साह… आणि नेतृत्वाच्या उपस्थितीने सजणार गोविंद चित्रमंदिर! त्यामुळे उद्याचा अभीष्टचिंतन सोहळा हा संजू परब यांच्या वाढदिवसाचा एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.



