माझी जवानी वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका! ; कंगना राणावतने रामदेव बाबांना फटकारलं!

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी तिने जंतरमंतरवरील आंदोलकांना गटर जनरेशन म्हणून वाद ओढवून घेतला होता. आता तिने थेट रामदेव बाबांशी पंगा घेतला आहे. रामदेव बाबांनी कंगना राणावतचं शिक्षण काढलं होतं. तिचं बालपण, तारूण्य आणि तिच्या आधीच्या कारनाम्यांविषयी भाष्य केलं होतं. रामदेव बाबांची ही टीका कंगनाच्या जिव्हारी लागली असून तिने थेट रामदेव बाबांना झिडकारलं आहे. माझं तारुण्य वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका, अशा शब्दात तिने रामदेव बाबांना फटकारलं आहे.

कंगना राणावतने पोस्ट करून रामदेव बाबांना फटकारलं आहे. बाबाजी, तुम्ही माझी जवानी वा बेडरूमबाबतची स्वप्ने पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गॉसिपच्या आधारेच अंदाज लावू शकतो. कमीत कमी मला खोट्या किंवा फ्रॉड मेडिकल दाव्यांवर कोर्टाने झापलेलं नाही. हे वास्तवावर आधारीत आहे. गॉसिपवर नाही. त्यामुळे मला कॅरेक्टरचं ज्ञान पाजळू नका. तुमच्या पेक्षा कितीतरी पटीने माझं कॅरेक्टर चांगलं आहे. माझा कोणताही फ्रॉड समोर आलेला नाही, असा हल्लाच कंगनाने चढवला आहे.

कंगना काय म्हणाली होती?

कंगनाने जेनजी आंदोलनानंतर पोस्ट केली होती. ज्या महिला स्वतंत्रपणे करिअर करतात, त्या महिलांच्या आयुष्याची नकल करणं तरुण हिंदू महिलांसाठी लज्जास्पद आहे. कोणत्याही कमाई शिवाय त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. ज्या महिला स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात. त्यांची मते बोल्ड असतात. त्यांचं करिअर असतं. आपल्या कृतीची त्या स्वत: जबाबदारी घेतात. त्या आपले आईवडील आणि कुटुंबाच्या जीवावर हे करत नाहीत. आता एक नवीन जनरेशन आली आहे. कथित पाश्चिमात्यकरण झालेल्या भारतीय महिलांची. मी या जनरेशनला गटर जनरेशन म्हणते. यातील तरुणीना शिक्षणात बऱ्या आहेत, ना दिसायला सुंदर. त्या इतक्या भ्रष्ट झाल्या आहेत की त्या साध्या गृहिणीही होऊ शकत नाही. त्यांच्याकडे काहीच नाहीये. त्या दारू, ड्रग्स आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याला अभिमानाने मिरवत असतात, असं कंगनाने म्हटलं होतं.

रामदेव बाबांना काय म्हणायचे होते?

कंगनाच्या या विधानावरच रामदेव बाबांची प्रतिक्रिया आली होती. कंगनाचं शिक्षण काय आहे? तिचं तारुण्य आणि बालपण कसं गेलं? तिचे जुने कारनामे कसे होते? मला त्याबाबत बोलायचं नाहीये. कुणालाही अशा पद्धतीने गटर म्हणणं हे डोकं फिरल्याचं लक्षण आहे, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

दरम्यान, कंगना राणावत भारत भाग्य विधाता या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने नर्सची भूमिका निभावली होती. या सिनेमाला चांगला रिव्ह्यू मिळाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमाच चांगली करामत करू शकला नाही. हा सिनेमा ओटिटिवर स्ट्रीम होत आहे. आता कंगना क्वीन-2 मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles