सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी बैठक प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर व जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या जीवनरक्षा कार्यालयात संपन्न झाली. यावेळी महागाई विरोधी जिल्हाधिकारी निवेदन करून आंदोलन करणे व पक्ष वाढीसाठी गावागावातील संपर्क वाढवणे व काँग्रेस पक्षाने विकास कामे केली असल्याने याची माहिती जनजागृती करून माहिती नागरिकांना देणे यावर भर देण्यात येणार आहे. यावेळी राजू मसूरकर यांनी आरोग्य सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मंजूर करण्यासाठी सावंतवाडी ते दौऱ्यावर आले असताना निवेदन 2013 नोव्हेंबरपूर्वी देऊन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्रातील बारा कोटी जनता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोरगरीब रुग्णांना आर्थिक अडचणीमुळे त्यांचा एक लाख 50 हजार शस्त्रक्रियेसाठी दरवर्षी दोन लाख पन्नास रुपये किडनीची शस्त्रक्रिया करण्यासाठी मंजूर करण्यात आली होती.
मोफत इलाज व्हावा म्हणून शस्त्रक्रिया औषधे जेवण व प्रभास खर्च या योजने अंतर्गत च्या काँग्रेस पक्षाचे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस यांच्या मंजूर करण्यात आले. त्यानंतर या योजनेचे नाव महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना 2017 जून रोजी युती सरकारच्या शासनाने बदलण्यात आले आता त्याचे नाव आयुष्यमान भारत प्रधानमंत्री महात्मा फुले जन आरोग्य योजना पाच लाख रुपयाची या शासन निर्णय घेऊन योजना सुरू केली आहे.
तसेच काँग्रेस पक्षाच्या देशातील पोस्ट खात्यामार्फत अपघात विमा स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना या कालावधीमध्ये अल्पशा दरात विमा योजना आता ती विमा टाटा कंपनी व सुंदरम कंपनी मार्फत प्रतिवर्षी तेराशे वीस रुपये भरल्यास म्हणजे दरमहा 115 रुपये अपघात विमा काढल्यास दरवर्षी 25 लाख रुपये अपघातामध्ये निधन झाल्यास वारसांना मिळतात त्या व्यतिरिक्त दीड लाख रुपये शालेय शिक्षण मुलांसाठी विमा योजना अंतर्गत दिले जातात. याव्यतिरिक्त कायमस्वरूपी अपंग झाल्यास कुठल्या व्यक्ती त्याला सुद्धा 25 लाख रुपये मिळतात किरकोळ अपघात झाल्यास दीड लाख रुपये खाजगीरित्या रुग्णालयामध्ये दाखल झाल्यास व त्याची शस्त्रक्रिया करायची असल्यास विमा योजने अंतर्गत मिळतात यामध्ये झाडावरून पडून मृत्युमुखी पाण्यात पडून मृत्यूमुखी विद्युत शॉक लागून अशा विविध कारणांनी कुठल्याही व्यक्ती अपघातात निधन झाल्यास त्यांना विमा योजनेअंतर्गत 25 लाख रुपये वारस दाखवलेल्या व्यक्तींना पोस्ट खात्यामार्फत मिळतात अशा विविध काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून योजनेची माहिती जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी कार्यकर्त्यांना दिली.
तसेच जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर यांनी सहकार क्षेत्रात निवडणुका लागणार आहे याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले. सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर तसेच उपस्थित प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा उपाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षवाढी संदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकी वेळी माजी आमदार स्व. पुष्पसेन सावंत यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी गाव तेथे काँग्रेस हे अभियान राबविण्यात यावे असे आवाहन प्रकाश जैतापकर निरीक्षक यांनी केले. सावंतवाडी महिला शहराध्यक्ष पदी सुमेधा सावंत व उपाध्यक्ष पदी निषाद बुरान यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे निरीक्षक यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष , महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, निरीक्षक सुभाष दळवी, जिल्हा काँग्रेस माझी अध्यक्ष तथा जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. समीर वंजारी महिला काँग्रेस प्रेमी अमिदी मेस्त्री, नगरसेवक तौकीर शेख, भाऊसाहेब देसाई, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, काँग्रेस प्रेमी पीटर फर्नांडिस, कौस्तुभ पेडणेकर, आनंद आयरे, विठ्ठल केदार, प्रदीप चौगुले, विष्णू पेडणेकर, सुधीर मल्हार, राजेंद्र सावंत, सदानंद नाडकर्णी, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अन्वर खान, रणजीत गावडे, आफताब हेरेकर, तुकाराम म्हापसेकर, सगुण गावकर, संतोष कासकर, संदीप सुकी, माजी शहर अध्यक्ष अरुण भिसे, ज्येष्ठ काँग्रेस नेते अनु नाडकर्णी, गणेश भिसे आदी काँग्रेस प्रेमी बहुसंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.



