कुशल बद्रिके सावंतवाडीत येणार अन् हास्याचे फवारे उडणार! ; आज ‘सुंदरवाडी दहीहंडी’चा थरार! ; ‘Gen Z with Bharat’ पोस्टरची सर्वत्र चर्चा, युवा नेते संदीप गावडे यांच्या कल्पकतेला मिळतेय दाद.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : गोविंदांच्या जल्लोषाने सावंतवाडी आज दुमदुमणार असून, ‘सुंदरवाडी दहीहंडी’च्या थराराला हास्यविनोदाची भन्नाट फोडणी मिळणार आहे. सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके यांची उपस्थिती! कुशल बद्रिके यांच्या मिश्कील शैलीने सावंतवाडीकरांना हास्याची भन्नाट मेजवानी मिळणार असून, त्यांच्या उपस्थितीने दहीहंडीचा रंग आणखी खुलणार आहे.

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या पटांगणावर आज सायंकाळी ५ वाजता ‘सुंदरवाडी दहीहंडी’चा हा भव्य सोहळा रंगणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके सज्ज झाली असून, सर्वाधिक थर रचणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल ₹१,११,१११ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये कमालीची उत्सुकता आणि चुरस निर्माण झाली आहे.

🇮🇳 ‘Gen Z with Bharat’ ठरतेय चर्चेचा विषय!

दरम्यान, या दहीहंडी सोहळ्याचे ‘Gen Z with Bharat’ हे हटके पोस्टर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नव्या पिढीची ऊर्जा, देशप्रेम आणि आधुनिक विचारांची सांगड घालत तयार करण्यात आलेल्या या संकल्पनेची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. युवा नेते संदीप गावडे यांच्या कल्पकतेची आणि नव्या पिढीशी जोडणाऱ्या या अनोख्या संकल्पनेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

 

दहीहंडीबरोबरच सावंतवाडीकरांना आज मनोरंजनाचीही भरगच्च मेजवानी मिळणार आहे. कोल्हापूरच्या मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण, ढोलपथकांचा दणदणाट आणि पारंपरिक नृत्याविष्कार यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून जाणार आहे.

एकीकडे गोविंदांच्या थरांची चुरस, दुसरीकडे ढोल-ताशांचा कडकडाट, त्यात मर्दानी खेळांचा रोमांच आणि कुशल बद्रिकेंच्या हास्याची खळखळाटी मेजवानी… त्यामुळे ‘सुंदरवाडी दहीहंडी’ हा आज सावंतवाडीकरांसाठी मनोरंजन, परंपरा आणि उत्साहाचा धमाकेदार डोस ठरणार आहे!

या भव्य सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles