रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत डंका!, साहिल लंगोटेची ‘वेटलिफ्टिंग’मध्ये दमदार उचल! ; ७१ किलो वजनी गटात पटकावला प्रथम क्रमांक, विभागीय स्तरावर झेप!

मालवण : क्रीडा क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावणाऱ्या साहिल नागनाथ लंगोटे याने वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी करत विभागीय स्तरावर धडक मारली आहे. क्रीडा व युवा संचलनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील क्रीडा संकुलात झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७१ किलो वजनी गटात साहिलने प्रथम क्रमांक पटकावला.

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी असलेल्या साहिलने आपल्या ताकदीसोबतच जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या विजयामुळे विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून, पुढील स्तरावरही दमदार कामगिरी करण्याची संधी त्याला मिळाली आहे.

साहिलच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी त्याचे अभिनंदन केले. विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

साहिलच्या या यशामागे माजी विद्यार्थी मिथिलेश रविंद्र खराडे यांचे मार्गदर्शन तसेच आर्यन सुर्वे यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे साहिलच्या यशाने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

जिल्ह्यात अव्वल ठरलेला साहिल आता विभागीय स्तरावरही आपल्या कामगिरीची छाप उमटविण्यास सज्ज झाला असून, त्याच्याकडून पुढील स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles