गणरायाच्या चरणी विकासाचा संकल्प! ; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी घेतले सरपंच गुणाजी गावडे यांच्या गणरायाचे दर्शन! ; वेत्येच्या विकासकामांवर झाली सकारात्मक चर्चा.

सावंतवाडी : गणरायाच्या मंगलमय चरणी नतमस्तक होत कोकणवासीयांच्या सुख-समृद्धीची मनोभावे प्रार्थना करण्यासोबतच गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तमाम कोकणवासीयांना सुख, समाधान, समृद्धी आणि भरभराट लाभो, अशी प्रार्थना केली.

गणरायाच्या दर्शनानिमित्त झालेल्या या सदिच्छा भेटीत गावविकासाच्या विविध प्रश्नांवरही मनमोकळी चर्चा झाली. वेत्ये गावातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच गावाच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांबाबत सरपंच गुणाजी गावडे यांनी युवा नेते विशाल परब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. भाजपाच्या माध्यमातून ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी युवा नेते विशाल परब यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावाच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही विशाल परब यांनी दिली. “गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आपल्या परीने योग्य ते सहकार्य करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी कास गावचे सरपंच प्रवीण पंडित यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

गणरायाच्या आशीर्वादाने भक्तीला विकासाची जोड आणि संवादातून गावाच्या प्रगतीचा नवा संकल्प, अशी सकारात्मक भावना या भेटीतून अधोरेखित झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles