गणरायाच्या चरणी भक्तिभावाची वंदना!, ‘पेडणेच्या राजा’च्या दरबारात युवा नेते विशाल परब सपत्नीक नतमस्तक! ; गोवा-सिंधुदुर्गच्या स्नेहबंधाला गणेशोत्सवाची भक्तिमय किनार!, नागरिकांना दिल्या गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पेडणे (गोवा) : भक्ती, श्रद्धा आणि आपुलकीच्या भावनेने भारलेल्या गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्र भाजपा युवा नेते श्री. विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब यांनी गोव्यातील प्रसिद्ध ‘पेडणेचा राजा’ तसेच सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ, पेडणे येथील श्री गणरायाचे सपत्नीक भक्तिभावाने दर्शन घेतले.

श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी गणेशोत्सवाच्या उत्साहात सहभागी होत त्यांनी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत सावंतवाडी नगर परिषदेच्या नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणरायाच्या दर्शनानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

गोवा–सिंधुदुर्गचा स्नेहबंध अधिक दृढ करणारा उत्सव –

गोवा आणि सिंधुदुर्गचे नाते हे केवळ सीमारेषांनी जोडलेले नसून संस्कृती, परंपरा, सामाजिक जिव्हाळा आणि आपुलकीच्या ऋणानुबंधांनी घट्ट विणलेले आहे. गणेशोत्सवासारखे सण या नात्याला भक्तीची आणि भावनेची नवी किनार देतात. दोन्ही भागांतील नागरिकांमध्ये असलेला स्नेह, संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळे हा जिव्हाळ्याचा बंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

‘गणरायाच्या चरणी श्रद्धा… मनामनांत आपुलकी… आणि गोवा–सिंधुदुर्गच्या नात्याला भक्तीची नवी जोड!’ अशा मंगलमय वातावरणात ‘पेडणेच्या राजा’चे दर्शन घेऊन विशाल परब दाम्पत्याने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles