सावंतवाडी : राष्ट्रसेवा, अंत्योदय आणि ‘एकात्म मानववाद’ या विचारांच्या माध्यमातून भारतीय जनजीवनाला नवी दिशा देणारे महान राष्ट्रचिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने राष्ट्रनिर्माणाच्या वाटचालीला वैचारिक अधिष्ठान दिले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत, या ‘अंत्योदय’च्या विचाराला त्यांनी आपल्या जीवनकार्यात केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या त्याग, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, धीरेंद्र म्हापसेकर, केतन आजगावकर, सचिन कुडाळकर, राजेश कळंगुटकर आणि सौरभ भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार हे केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित नसून, राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा अखंड विचारदीप आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



