नितीन गावडे
सावंतवाडी : मागील आठवडाभरापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे न्हावेलीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे आभाळ फाटलं अन शेतकऱ्याच्या डोळ्यात दाटलं असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे न्हावेलीतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेतात येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचा ना पंचनामा, ना पहाणी झाली.
न्हावेलीत चार वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी केलेली भात कापणी पाण्यात तरंगू लागली तर अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्याचे सर्व कष्ट वाया गेले.
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाचे पंचनामा करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी न्हावेली गावचे उपसरपंच श्री.अक्षय पार्सेकर यांनी केली आहे.