सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालकाप्रमुखपदी डायगो (मायकेल) फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
मायकेल डिसोजा यांचे माजी आमदार राजन तेली, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, ज्येष्ठ नेते बाळा गावडे यांसह तमाम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.