अभिमानास्पद! – मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या राधिका सोनाळकरची राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.

सावंतवाडी:  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. राधिका विश्वास सोनाळकर हिची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील सांघिक (Team Event) प्रकारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
राधिकाची १७ वर्षांखालील (Under-17) तसेच खुल्या (Open) गटात निवड झाली असून, तिच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे, अथक मेहनतीचे आणि बॅडमिंटन खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे हे फलित आहे तसेच राधिकास बॅडमिंटन कोच श्री सुमुख चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले
दि. २९ सप्टेंबर रोजी सातारा येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राधिका सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, क्रीडा शिक्षक भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles