पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर एसीबीचा छापा. ; दिलीप खेडकर यांच्या घराची झाडाझडती!

अहिल्यानगर : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या वडिलांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकरांच्या घरावर एसीबीने छापा टाकला आहे. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी पहाटेपासून झाडाझडती सुरू आहे.

नाशिक आणि अहिल्यानगर एसीबी पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई केली. दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झला आहे. तर विविध कागदपत्र , आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या नोंदींची तपासणी सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles