आरोग्याची ‘नाडी’ तपासणार… आजारांवर वेळीच घालणार लगाम! ; भटवाडी शाळा नं. ६ मध्ये ‘जन आरोग्य’ तपासणी शिबिर; हिमोग्लोबिनपासून किडनी-लिव्हरपर्यंत मोफत तपासण्या!

सावंतवाडी : ‘निरोगी शरीरातच निरोगी समाजाची पायाभरणी होते’ या विचाराला कृतीची जोड देत प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांसाठी भटवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ येथे ‘जन आरोग्य’ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, किडनी, लिव्हर यांसह विविध आरोग्यविषयक तपासण्यांचा समावेश आहे.

दैनंदिन धावपळीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष अनेक आजारांना नकळत आमंत्रण देत असते. मात्र, आजाराचे गांभीर्य वाढण्यापूर्वीच त्याची लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी तपासणी करून घेणे हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. याच उद्देशाने हे शिबिर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भटवाडी, बाहेरचावाडा परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांनी केले आहे.

‘आरोग्याची काळजी आज घेतली, तर उद्याचे संकट टाळता येईल!’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घ्यावी, असेही आयोजकांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles