Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

एकही कार नाही, ६२ लाखांचे कर्ज, देवेंद्र फडणवीसांची संपत्ती सव्वा ५ कोटी.! ; पत्नीकडे जास्त संपत्ती, एकूण मालमत्ता किती?

नागपूर : राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणुकीतील शपथपत्रात मालमत्तेसह इतर बाबींची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रात  दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस दाम्पत्याकडे सुमारे 13 कोटींची संपत्ती आहे.

फडणवीस यांच्या मालमत्तेसंदर्भात सविस्तर माहिती – 

शपथपत्रात  दिलेल्या माहितीनुसार, स्थावर आणि जंगम मालमत्तेसह देवेंद्र फडणवीसांकडे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. तर अमृता फडणवीस या 7 कोटी 90 लाखांच्या संपत्तीची मालकीन आहेत. विधानसभा निवडणुकीतील शपथपत्रात मालमत्तेसह इतर बाबींचा तपशील देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या शपथपत्रात नेमकं काय ?

फडणवीस कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची एकही कार नसल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकूण संपत्ती 5.2 कोटी रुपयांची आहे.
यामध्ये 56 लाख जंगम आणि 4.6 कोटी स्थावर मालमत्तेची नोंद आहे. यामध्ये शेतजमीन आणि निवासी मालमत्तेचाही समावेश आहे. अमृता फडणवीसांच्या नावे 7.9 कोटी संपत्तीची नोंद  आहे. यामध्ये 6.9 कोटी जंगम मालमत्ता, तर 95 लाख स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडून 62 लाखांचे कर्ज घेतल्याचे फडणवीसांकडून शपथपत्रात नमूद केले आहे. ॲक्सिस बँक आरोप प्रकरणी देवेंद्र फडणवीसांकडून कोर्टात केस केल्याची शपथपत्रात नोंद आहे.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत फडणवीसांनी दाखल केला उमेदवारी अर्ज –

राज्यात आज अनेक मातब्बर नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढली.  त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर केला.  यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जात आशीर्वाद घेतले आणि यावेळी त्यांचे गडकरी कुटुंबीयांकडून औक्षण देखील करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यंदा सलग सहाव्यादा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी केली होती. सोबतच साधू संतही येथे फडणवीस यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचलेले आहेत. विशेष म्हणजे उत्तराखंडमधून नागा साधू देखील फडणवीस यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी दाखल झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles