सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार राजन तेली महाविकास आघाडीकडून मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तरी याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयाकडून प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
माजी आमदार राजन तेली ‘मविआ’कडून २९ ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज ; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन.
0
48