नाट्य क्षेत्रातील ‘दादा’ला सिंधुदुर्गतील तमाम सुहासप्रेमी, रंगकर्मी आणि विविध नाट्य संस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली! ; सुहास वरुणकर यांच्या शोकसभे दरम्यान सभागृह झाले भावुक.

कणकवली : कणकवलीतील सांस्कृतिक चळवळीतील आंब्याचा टाळ, कलाकार, पार्श्व संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजकार, प्रतिथयश दिग्दर्शक सुहास वरुणकर सर्वांचा नाट्य क्षेत्रातील दादा यांचे रविवार दिनांक 11/10/2026 रोजी अकाली निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी कणकवली कॉलेज च्या एच पी सी एल सभागृह येथे कणकवली येथील विविध नाट्य संस्था, जिल्ह्यातील रंगकर्मी व सुहासप्रेमी यांच्या मार्फत शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
सर्व प्रथम कै. सुहासदादा यांच्या प्रतिमेला वंदन करून नगराध्यक्ष संदेश पारकर यांचेहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्याच्या पवित्र स्मृती जागर करणारा, त्यांच्याप्रती आदर प्रकट करणारा दीप प्रज्वलित करून त्यांचा स्मृतीगंध दरवळणारा धूप दर्शविण्यात आला…… अख्खे सभागृह सुहासदादच्या आठवणीने गहिवरले.
सुहास च्या जाण्याने सिंधुदुर्ग च्या नाट्य चळवलीला प्रचंड धक्का बसला असून अपरिमित हानी झालीय. कणकवली च्या प्रत्येक सांस्कृतिक सुहासाची सतत उणीव भासत राहील अशी आदरांजली संदेश पारकर यांनी वाहिली. बालपणापासूनचा जोडीदार अभय खडपकर बोलताना म्हणाले बागेश्री पासून सुरु झालेला सुहास चा रंगमंचिय प्रवास अक्षरसिंधु परिवारात बहरला, स्थिरवला.सुहास सारखा नाट्यवेडा होणे नाही.रंगभूमी सेन्सॉर बोर्ड सदस्य व अक्षरसिंधूचे संस्थापक विजय चव्हाण भावुक होताना म्हणाले आपल्याला नाट्य लेखक होण्यासाठी सुहासची पत्नी विनिता वहिनी चे प्रोत्साहन मिळाले मात्र आपल्या नाट्य संहिताना सुहासने महाराष्ट्रात नाव व उंची मिळून दिली. गावय, भाविण, शबय, झम्पय, या नाटकाना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून देताना आपली मालवणी मातीचे विषय आणि मालवणी भाषा सर्वदूर पोचविली.जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीत निरपेक्ष योगदान देणाऱ्याची अपेक्षित दखल घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा हरीभाऊ भिसे यांनी बोलताना कणकवली कॉलेज ला सुहास ने दोनवेळा सुवर्ण पदक मिळवून दिले,महाविद्यालय च्या सांस्कृतिक जडणघडणीतील योगदान व्यक्त केले. आचरेकर प्रतिष्ठान चे शरद सावंत यांनी साठा उत्तराची कहाणी नाटकवेळच्या सुहास ने आयत्या वेळी पेललेले शिवधनुष्य सांगताना सुहास आपला रंगभूमी वरचा गुरु असल्याचे सांगितले.
यावेळी सुहास अलीकडेच अक्षरसिंधू निर्मित आणि विजय चव्हाण लिखित आणि बहुचर्चित नाटक ” धयकालो ” नाटकाची तालीम घेत होता. त्या नाटकातील सुहासने बसविलेला एक सहजसुंदर प्रवेश रोहित राणे व सिद्धेश म्हसकर या कलावंतांनी सर्वामसमोर सादर करून सुहास ला आदरांजली अर्पित केली.
काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहता येत नसलेने ज्येष्ठ रंगकार्मी दीपक परब, चंदू शिरसाठ, ऋषीं देसाई,शाम नाडकर्णी, केदार देसाई, अभय नेवगी, कल्पना बांदेकर, संभाजी सावंत, रजनीश राणे,माळी सर ,भालचंद्र कुबल, कुमार नाडकर्णी, रमेश नार्वेकर, बाळू खामकर, पप्पी कवठणकर, इत्यादीने शोकसंदेश पाठवून आदरांजली वाहिली.
यावेळी सुहास वरुणकर यांचे कुटुंबिय मुलगी दुर्गेशा, जावई राम, भाचा शैलेश महाडिक, शैलेश ची पत्नी, व मुलगा, सुहास चा पुतण्या इत्यादी उपस्थित होते.
यावेळी कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री अनिल
डेगवेकर , डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ श्री महालिंगे,
शिंपी समाजाचे राजू वर्णे, ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र कदम, मालवणच्या स्त्री अभिनेत्या सुजाता शेलटकर, राज्य परिवहनचे राजन भोसले, अक्षरसिंधु अध्यक्ष संजय राणे, रंगकर्मी प्रा शेखर गवस, प्रा मिलिंद गुरव, यंगस्टार चे अण्णा कोदे, संजय मालांडकर,महानंद चव्हाण,इत्यादी अनेक मान्यवरांनी सुहासाच्या आठवणीचा जागर मांडला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीसखाराम सकपाळ, बापू खरात, रोटरी क्लब चे श्री संतोष कांबळे, पर्यवेक्षक प्रा महादेव माने , महेश कोवळे श्री मंगेश आरेकर , shri वावलिये,महेंद्र मुरकर राजेंद्र वर्ण,कणकवली कॉलेज सांस्कृतिक विभागाचे श्री विजय सावंत प्रा डॉ सोमनाथ कदम कामसर,अक्षरसिंधु सचिव मयुर चव्हाण , विवेक वाळके,किशोर कदम,प्रमोद तांबे, संतोष कदम, सुदिन तांबे, पूजा राणे, पूनम सावंत, हर्षदा बागायतकर, कीर्ती गुरव, अजय पडवळ,सिद्धेश म्हसकर, रोहित राणे, सत्येंद्र जाधव, ,वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान चे ॲड . नारायण देसाई,राजेश कदम,राजा राजाध्यक्ष, मा. नगरसेवक उमेश वाळके, रंगकर्मी निलेश पवार,गंधर्व परिवाराचे श्री मनोज मेस्त्री, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग कोंकण समन्वयक प्रा. आशिष नाईक सर,आणि तमाम सुहास प्रेमी तसेच कणकवली महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी.. विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles