सावंतवाडीत आज रंगणार शरीरसौष्ठवाचा थरार!, ‘भाजपा श्री’ स्पर्धेसाठी जय्यत तयारी, युवा वर्गात प्रचंड उत्सुकता! ; फिटनेसचा जागर, सामर्थ्याचा आविष्कार अन् शरीरसौष्ठवाचा दिमाखदार सोहळा! ; भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची मुख्य उपस्थिती तर युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार दिमाखदार उद्घाटन!

सावंतवाडी : शरीरसौष्ठव, सामर्थ्य आणि शिस्तीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी आज सावंतवाडीकरांना मिळणार आहे. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार आज रंगणार असून, या स्पर्धेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेषतः युवक आणि नव्या पिढीतील ‘Gen Z’ तरुणांमध्ये या स्पर्धेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात रुजविलेल्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला बळ देत युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम, तंदुरुस्ती आणि शारीरिक सुदृढतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन नव्हे, तर युवकांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी अध्यक्ष हितेन नाईक आणि आंबोली अध्यक्ष विनेश तावडे यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरासह परिसरातील क्रीडाप्रेमी आणि शरीरसौष्ठव क्षेत्रातील तरुणांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी रात्री महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आयोजनस्थळी भेट देत तयारीची पाहणी केली. स्पर्धेचे नियोजन, व्यवस्था आणि अन्य आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

एकीकडे फिटनेसचा संदेश, दुसरीकडे तरुणांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि सामर्थ्याचा आविष्कार, तर तिसरीकडे ‘भाजपा श्री’चा मानाचा किताब पटकाविण्यासाठी रंगणारी चुरस… अशा उत्साहपूर्ण वातावरणात आज सावंतवाडीत शरीरसौष्ठवाचा दिमाखदार सोहळा रंगणार असून, या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles