सावंतवाडी : कोकणच्या राजकीय पटलावर महत्त्वपूर्ण घडामोडींचे केंद्र ठरलेल्या सावंतवाडीत आज राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींनी वातावरणात उत्साह निर्माण झाला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांचे सावंतवाडीत आगमन झाले. यावेळी त्यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचीही विशेष उपस्थिती होती. एकाच वेळी तीन प्रमुख राजकीय नेत्यांची झालेली उपस्थिती लक्षवेधी ठरली असून, या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत सावंतवाडीत दाखल झाले. त्यांच्या आगमनाने स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संजू परब यांच्या निवासस्थानी झालेल्या या सदिच्छा भेटीदरम्यान नेत्यांमध्ये अनौपचारिक संवाद आणि सद्भावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची एकत्रित उपस्थिती ही सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळासाठी चर्चेचा विषय ठरली आहे.



