शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज. ; अनेक दिग्गजांची उपस्थिती.

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना – भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे उद्या मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी खासदार नारायणराव राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या व महायुतीच्या इतर नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल येथून महायुतीची भव्य रॅली निघणार असून यानंतर गांधीचौक येथे दीपक केसरकर कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत व यानंतर येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles