ना कोणता बडेजाव, ना सत्काराचा सोहळा, देवी शांतादुर्गाचा मनोभावे आशीर्वाद अन् घासातून जपला माणुसकीचा गोडवा! ; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचा साधेपणा खोक्रलच्या जत्रोत्सवात ठरला चर्चेचा विषय, पदाधिकारी-कार्यकर्त्यांसमवेत घेतला भजीचा आस्वाद!

दोडामार्ग : राजकारणात पदाचा रुबाब मिरवणारे अनेकजण दिसतात; मात्र पदापेक्षा माणुसकीला, प्रसिद्धीपेक्षा साधेपणाला आणि सत्कारापेक्षा जनतेच्या विश्वासाला अधिक महत्त्व देणारे नेतृत्व विरळच! याच साधेपणाची प्रचिती भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी खोक्रल येथील श्री शांतादुर्गा सिद्धेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवात उपस्थित राहून दिली.

खोक्रल येथील श्री शांतादुर्गा सिद्धेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त युवा नेते विशाल परब यांनी मंदिरात जाऊन श्री देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक, ग्रामस्थ आणि भक्तगणांशी आपुलकीने संवाद साधत जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

सत्काराचा

विशेष म्हणजे, ना कोणता बडेजाव, ना औपचारिक सत्काराचा सोहळा, ना प्रसिद्धीचा दिखावा! केवळ देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद आणि जनतेच्या विश्वासाची समर्थ साथ मिळावी, हीच भावना मनात ठेवत विशाल परब यांनी जत्रोत्सवाचा आनंद सर्वसामान्यांप्रमाणे अनुभवला. जत्रेतील विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना त्यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी चक्क गरमागरम भजीचा आस्वाद घेतला.

राजकीय व्यासपीठावर नेतृत्वाची छाप उमटवणारे विशाल परब जत्रेच्या गर्दीत मात्र सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळले. पदाचा कोणताही अहंकार न बाळगता कार्यकर्त्यांसोबत भजीचा आस्वाद घेणारी त्यांची ही साधी, सहज आणि आपुलकीची कृती उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून गेली. त्यामुळे त्यांच्या या साधेपणाची खोक्रलच्या जत्रोत्सवात खमंग चर्चा रंगली असून, त्यांच्या या दिलखुलास स्वभावाचे आणि जनसामान्यांशी जोडलेल्या नात्याचे कौतुक होत आहे.

याप्रसंगी भाजपा युवा नेते विशाल परब, तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, पांडुरंग गवस, आनंद तलनकार, रंगनाथ गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम असलेला हा जत्रोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, अशी प्रार्थना विशाल परब यांनी श्री देवीचरणी केली.

मोठेपणा हा पदात नसतो, तर माणसांशी जोडलेल्या नात्यात असतो… आणि कधी कधी एका साध्या भजीच्या घासातूनही नेतृत्वातील माणुसकीची खरी चव अनुभवायला मिळते, याचीच प्रचिती खोक्रलच्या जत्रोत्सवात आली!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles