भारतामधील ‘या’ ३ बँका बुडाल्यास देशाच्या अर्थव्यवस्था संकटात. ; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सांगितली नावं….

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं. बँकांकडून कामकाज करताना बँकिंग नियमन कायदा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दिलेल्या सूचनांचं आणि नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. आरबीआयमुळं देशाच्या अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे चालते. मात्र, आरबीआयनं तीन मोठ्या बँकांची नावं जाहीर केली आहेत. आरबीआयनं या तीन बँका बुडाल्यास देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडू शकते असं म्हटलं. आहे. आरबीआयनं या तीन बँकांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांची नावं आहेत.  या तीन बँका देशातील महत्त्वाच्या बँका आहेत, या बँका पुढे देखील कायम राहतील, असं म्हटलं आहे.

तीन बँका का महत्त्वाच्या?

RBI नं म्हटलं की या बँकांना सिस्टमिकली महत्त्वाच्या बँका म्हटलं जातं. या बँकाचं देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि बँकिंग सिस्टीममध्ये महत्त्वाचं योगदान आहे. यापैकी एखादी बँक अचानक बुडाल्यास याचा परिणाम पूर्ण बँकिंग सिस्टीम आणि अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. यामुळं या बँकांना टू बिग टू फेल म्हणजेच इतक्या मोठ्या बँका म्हटलं जातं की या बँका बुडाल्यास मोठं संकट निर्माण होऊ शकतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार या बँकेत सर्वसाधारण पैशाऐंवजी अतिरिक्त पैसे ठेवावे लागतात. याचा अर्थ कोणत्याही आर्थिक संकटात बँकेला नुकसान सहन करण्यासाठी पुरसे पैसे असले पाहिजेत.  या नियमानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांच्या जोखमीच्या हिशोबानुसार निश्चित संपत्तीच्या 0.80 टक्के रक्कम अतिरिक्त ठेवावी लागेल. एचडीएफसी बँकेला 0.40 टक्के पैसे अतिरिक्त ठेवावे लागतील. तर, आयसीआयसीआय बँकेला 0.20 टक्के रक्कम किंवा पैसे अतिरिक्त ठेवावे लागतील. आरबीआयनं 2015 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला या श्रेणीत ठेवलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये आयसीआयसीआय बँक आणि 2017 मध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश करण्यात आला.

खातेदारांवर काय परिणाम होणार?

या तीन बँकांमध्ये ज्या ग्राहकांची खाती असतील त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. या नियमाचा मुख्य उद्देश बँकिंग सिस्टीमला सुरक्षित ठेवणं हा आहे. या नियमामुळं या मोठ्या बँकांना आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे असतात. यामुळं बँकिंग व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles