भाजपा बांदा मंडल सरचिटणीस पदी प्रवीण पंडित यांची नियुक्ती.

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा मंडलच्या सरचिटणीस पदी प्रवीण अशोक पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा बांदा मंडल अध्यक्ष मधुकर मोहन देसाई यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली असून भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

ही नियुक्ती आज करण्यात आली असून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. श्री. सारंग यांनी प्रवीण पंडित यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, मनोज नाईक, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, विनेश तावडे, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, बाळू शिरसाट आदी उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles