सावंतवाडी : दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मळेवाड जंक्शन येथील व्यापारी, दुकानदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना गुलाबपुष्प देऊन दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. केसरकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी, दुकानदारांनी सुद्धा यावेळी मंत्री केसरकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी पंचायत सदस्य सीताराम (बाळा) शिरसाट, लाडोबा केरकर, मळेवाड विभाग प्रमुख अमित नाईक, विभाग प्रमुख शंकर नाईक, योगेश नाईक, सरपंच श्रावणी नाईक, धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, आरोस उपसरपंच प्रसाद नाईक, संजय पांगम, तानाजी खोत, युवा सेनेचे नील प्रभूझांट्ये यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.