Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

राजकीय मैदान गाजविणारा ‘हा’ पठ्ठ्या सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर, आ. नितेश राणेंनी केली बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. ; अधिकार्‍यांना योग्य मदतीच्या केल्या सूचना, शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्‍याचे आश्वासन.

 

कणकवली  : तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर देखील झाडे पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची तात्काळ दखल घेवून कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी बेळणे खुर्द गावातील नुकसान ग्रस्तांची भेट घेवून विचारपुस करत संवाद साधला. आ.नितेश राणे यांनी महसुल विभागाच्या अधिका-यांसह , वीज वितरणच्या अधिका-यांना तात्काळ पंचनामे करा व वीज तातडीने सुरु करा असा सुचना दिल्या. तसेच शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ. नितेश राणे यांनी नुकसान ग्रस्तांना दिले.

यावेळी संदीप सावंत, भाई आंबेलकर , पंढरी चाळके , राजेंद्र चाळके , प्रथमेश सकपाळ , राजेंद्र तांबे , देवदास करांडे , वैभव चाळके आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बेळणे खुर्द गावातील चक्रीवादळात रामकृष्ण गणपत चाळके – घराचे पत्रे उडाले , दत्ताराम सकपाळ – घरावर झाड पडून पत्रे उडाले , बाळा पवार – गाडीवर झाड कोसळून नुकसान, देवदास करांडे – घरावरचे पत्रे उडाले, श्री.देव महापुरुष मंदीर – पत्राशेडवर झाड पडल्याने मोठे नुकसान तसेच वीजेच्या पोलवर झाडे कोसळून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या नुकसान ग्रस्तांची आ. नितेश राणे यांनी भेट घेवून विचारपुस करुन मदतीसाठी प्रशासनाला सुचना केल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles