मोठी बातमी – रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये बदल झाला का? ; गृहकर्ज, वाहन कर्जाच्या हप्त्यावर काय परिणाम?

नवी दिल्ली : आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळीदेखील आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम असेल. गुरुवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले.

शक्तिकांत दास यांनी दिले होते संकेत –

याआधी गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटच्या दरावर भाष्य केलं होतं. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाई दर लक्षात घेता व्याज दरात कपात करण्याबाबात सध्याच निर्णय घेणे थोडे घाईचे ठरेल. भारतासह सध्या संपूर्ण जगात आर्थिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीबाबत सध्याच चर्चा करणे योग्य नाही. आरबीआयने महागाई दर चार टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. तर प्रत्यक्ष मात्र महागाई दर 5 टक्क्यांपेक्षा पुढे गेलेला आहे, असे तेव्हा शक्तिकांत दास म्हणाले होते.

18 महिन्यांपासून रेपो रेट जैसे थे –

आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची प्रती दोन महिन्यांनी आयोजित केली जाणारी चलनविषक धोरण ठरवणारी तिसरी बैठक पार पडली. 6 ते 8  ऑगस्ट या कालावधीत ही बैठक झाली. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखील एकूण सहा सदस्य असलेल्या बैठकीत रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles