शिरोड्यात ठाकरे सेनेला दे धक्का.!, सरपंच लतिका रेडकर यांचा शिवसेनेत प्रवेश. ; मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत.

सावंतवाडी: तालुक्यातील शिरोड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच लतिका रेडकर यांनी सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिरोड्यातुन ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. सरपंच लतिका रेडकर या जनतेतून सरपंच म्ह्णून निवडून आल्या होत्या. यानंतर शिरोडा ग्रामपंचायतवर उबाठा शिवसेनेची सत्ता आली होती. दरम्यान दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच लतिका रेडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, तालुकाप्रमुख नारायण राणे, सुनील डुबळे, सुरज परब, भाजपचे शिरोडा ग्रा प सदस्य मयुरेश शिरोडकर, शिवसेना ग्रा प सदस्य जगन बांदेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles