आ. नितेश राणे यांचा गोवळमध्ये उबाठाला दणका, ग्रामपंचायत सदस्य माधुरी बोडेकर भाजपात.

कणकवली : गोवळ ग्रामपंचायत येथील उबाठा पक्षाच्या सदस्य माधुरी बोडेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. गोवळचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
त्यांच्यासोबत माधुरी बोडेकर, अजित बोडेकर सुरेश फाले, गंगाराम फाले, रवींद्र फाले, नामदेव फाले, अंबाजी बोडेकर, गंगाराम बोडेकर, आप्पा बोडेकर, तुकाराम बोडेकर, बाळकृष्ण बोडेकर, सागर बोडेकर, सुरेखा बोडेकर, संगीता बोडेकर शकुंतल बोडेकर, वनिता फाले. यावेळी महेश उर्फ बंड्या नारकर, राजेश जठार पप्या काळे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles