Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

भाजपाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसन्ना देसाई यांची निवड.

वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे , आणि या अभियानाच्या प्रदेश संयोजकपदी आ. उमा खापरे यांची निवड केली आहे .

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्य़ात करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभियानाची जिल्हा समिती गठीत करण्यात आली असून , जिल्हा संयोजक म्हणून प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व सहसंयोजक म्हणून रणजित देसाई व संदिप साटम यांची निवड केली आहे .तसेच जिल्ह्यातील १४ हि मंडलात ” हर घर तिरंगा ” अभियान समिती गठीत करण्यात आली आहे .
जिल्हाभर लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषि स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत.

शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ११ ते १४ ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत.
वरील कार्यक्रम शांततेत व देशभक्तीच्या भावनेने आणि राष्ट्रीय अभिमानाने उस्ताहपुर्वक करावेत , असे आवाहन या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे .

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles