सावंतवाडीचा चिमुकला कबीर झळकला हैदराबाद येथील मासिकात.

सावंतवाडी :  येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर हा चिमुकला अगदी बाल वयातचं देश पातळीवर नावलौकिक मिळवत आहे. आपण कबीरचे नाव कोणत्या ना कोणत्या उपक्रमातून नेहमी ऐकत असतो.
कबीरने सर्पमित्र, पर्यावरण संवर्धन, प्राणीमित्र, निसर्ग रक्षक, मॅरेथॉन धावक म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे.
त्याच्या याच वेगळेपणाने कबीरने समाजात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. त्याच्या या वेगळेपणाची दखल घेत हैदराबाद येथून प्रकाशित होणारी ‘The Jublee Hills’ या मासिके मध्ये चक्क ६ पानी लेख प्रकाशित करण्यात आले आहे. कबीर वेळोवेळी आपल्या वेगवेगळ्या विचारांनी समाजाला काही न काही संदेश देत असतो.

कबीरच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles