सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र सगळीकडे फिरत आहे. मात्र याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांच्याशी संपर्क साधला असता मला अजून ते पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आता अधिकृत माहिती मिळू शकत नाही. याबाबत आपण उद्या नक्की काय खरे आहे हे खात्री करून सांगतो असे सांगितलं. एकूणच अर्चना घारे – परब यांच्यावरील पक्ष कारवाई वरून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.



