सावंतवाडी: विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई वृषाली श्रीकांत शिंदे व त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी आज सावंतवाडी येथे हजेरी लावली.

यावेळी सावंतवाडी मोती तलावाकाठी बसलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच दुकानांना भेटी देत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सौ. शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सौ. पल्लवी केसरकर, सौ. सोनाली केसरकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


