Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

विशाल परब यांना मिळाली ‘वंचित’ची साथ.!, विशाल परबांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावू ! : जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या मागे आता वंचित बहुजन आघाडीची भरभक्कम ताकद उभी राहिली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विशाल परब यांना पाठिंबा देत त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी आपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा विशाल परब यांना देत असल्याचे जाहीर केले. तसेच विशाल परब यांच्या विजयासाठी आपण आणि आपल्या पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते भरभक्कमपणे साथ देणार असून विशाल परब नक्कीच निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी उमेदवार विशाल परब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वाय. जी. कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर, प्रभारी अध्यक्ष दोडामार्ग सुरेश जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रामदास जाधव, सखाराम जाधव उपाध्यक्ष वेंगुर्ले, गजानन जाधव संघटक वेंगुर्ले, प्रज्ञेश जाधव युवक आघाडी उपाध्यक्ष वेंगुर्ला, संतोष जाधव विभाग अध्यक्ष बांदा, विशाल भट भेडशी , विठ्ठल जाधव, मनोहर जाधव, आनंद जाधव, राकेश जाधव शेर्ले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान वंचित आघाडीच्या या पाठिंब्यामुळे आपला विजय अजून बळकट झाला असल्याचे उमेदवार विशाल परब यांनी व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या तमाम पदाधिकार्‍यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles