सावतवडी : देशाचा अमृत महोत्सवी संविधान दिन भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रारंभी तालुका अध्यक्ष विजय नेमळेकर व महिला अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे व संविधान पुस्तकेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर बुद्ध वंदना झाल्यानंतर सुनील जाधव यानी प्रास्तावितेचे वाचन करून शपथ ग्रहण केली.
यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बुधाजी कांबळी यांनी संविधान म्हणजे नेमकं काय?, संविधानाचे महत्त्व भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मीनाक्षी तेंडुलकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ ठेवा म्हणजे आपले संविधान असल्याचे स्पष्ट करून संविधानाचे रक्षण करणे तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. तर अध्यक्षपदावरून बोलताना विजय नेमळेकर यांनी संविधानामुळेच या देशात परिवर्तनाचे नांदी सुरू झाल्याचे सांगून याचे सांगून संविधानामुळेच या देशात समता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.
यावेळी ॲड. एस. के. चेंदवणकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक चंद्रशेखर जाधव यांनी केले तर आभार मिलिंद नेमळेकर यांनी मानले. यावेळी आंबेडकर चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVT –