Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

वेंगुर्ले भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आरवली येथे वेतोबा जत्रोस्तवाच्या मुहूर्तावर होणार! : जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी प्रसन्ना देसाई. ; वेंगुर्ले तालुका सदस्य नोंदणी अभियान संयोजक पदी प्रशांत खानोलकर यांची निवड.

वेंगुर्ला : भारतातील सर्वात मोठी राजकीय पार्टी भाजपाने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले असुन संपूर्ण देशात १० कोटी सदस्य करण्याचे अभियान हाती घेतले आहे. हे अभियान ५१ दिवस चालणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सदस्यत्व बहाल करून या अभियानाची सुरुवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राष्ट्रीय संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीड कोटी सदस्य बनविण्याचे टार्गेट दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांची या अभियानाच्या जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली असून प्रत्येक मंडलात सहा जणांची कमिटी बनविण्यात आली आहे.
वेंगुर्ले तालुक्यात तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली असून सहसंयोजक म्हणून विष्णु उर्फ पपु परब, सौ.सुजाता पडवळ, गुरुनाथ ऊर्फ नाथा मडवळ, लक्ष्मीकांत कर्पे, वैभव होडावडेकर, अमेय धुरी यांची निवड करण्यात आली आहे.
सदर अभियानाच्या शुभारंभाची माहीती देण्यासाठी वेंगुर्ले तालुका कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, संयोजक प्रशांत खानोलकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, सोमनाथ टोमके, नगरसेवक प्रशांत आपटे उपस्थित होते.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles