Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विलवडे क्रमांक २ शाळेचे सुयश!

सावंतवाडी : नुकत्याच बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे नं.1 शाळेच्या भव्यदिव्य पटांगणावर व सांस्कृतिक महोत्सव बांदा क्रेंद्रशाळेच्या रंगमंचावर नूकताच संपन्र झाला.कबड्डी लहान गट स्पर्धेत कुमारी रुही सावंत हिने विलवडे संघासोबत खेळताना नेत्रदीपक कामगिरी करुन संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले.तर बांदा येथे संपन्र झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात समूहगान लहान गटात यशस्वी कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदक पटकावले. विलवडे नं.2 शाळेच्या उत्कृष्ट गायनाने रसिकांची मने जिंकली. वाद्यवृंद म्हणून पूजा मेस्री,जयेश दळवी व भाविक सावंत उत्कृष्ट साथ .दिली. छोटी शाळा असूनही उज्वल यशाबद्दल सरपंच प्रकाश दळवी,माजी उपसभापती कृष्णा सावंत, शा. व्य. समिती अध्यक्षा रश्मी सावंत,विशाखा दळवी,केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, अंगणवाडी सेविका सायली दळवी, मदतनीस मनाली दळवी, शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले.मार्गदर्शक म्हणून सरपंच प्रकाश दळवी, मुख्याध्यापक सुरेश काळे व सहशिक्षिका प्रमिला ठाकर यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles