राज्यस्तरीय कला उत्सव नृत्य स्पर्धेत ‘RPD’ची स्वरांगी खानोलकर राज्यात अव्वल.!

सावंतवाडी : राज्यस्तरीय कला उत्सव नृत्य स्पर्धेत येथील आणि पार्वती देवी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. स्वरांगी खानोलकर राज्यात अव्वल ठरली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमशालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या मार्फत कला-उत्सव सन २०२४ – २५ च्या राज्य स्तरीय विविध स्पर्धांसाठी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इ. ११ वी कला शाखेची विद्यार्थिनी कु. स्वरांगी संदीप खानोलकर हिने राज्यस्तरावर नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला .
तिची भोपाळ मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल स्वरांगी तसेच मार्गदर्शक शिक्षक व पालक वर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री. विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही .बी . नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समितीचे अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ . सुमेधा नाईक, तसेच पालक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कु. स्वरांगी खानोलकरचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनीय सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, प्रभारी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर  ,पर्यवेक्षक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पूनम कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles