Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

भाजपा म्हणजे नटरंगी नार.! ; संजय राऊतांची संसदेबाहेरील राड्यानंतर जहरी टीका.

नवी दिल्ली : काल संसदेबाहेर, नवीन संसदेच्या पायऱ्यावर पहिलेच आंदोलन झाले आणि त्याला गालबोट लागले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर धक्का-बुक्कीचा आरोप लावला. एखाद्या गल्लीतील भांडणासारखा हा प्रकार उभ्या देशानेच नाही तर जगाने पाहिल्याची चर्चा रंगली. संसदेबाहेरील महाभारतावर आज संजय राऊत यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. त्यांनी भाजपावर तुफान शेरेबाजी केली. ही भाजपाची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला.

काल काय झाले?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावरून खरा वाद निर्माण झाला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी मग त्यावरून आरोपांची राळ उडाली. त्याला प्रत्युत्तर भाजपा खासदारांनी काँग्रेस दुटप्पी असल्याचा आणि त्यांनी वेळोवेळी आंबेडकरांचा अपमान केल्याचा ठपका ठेवला. काल सकाळी नवीन संसद भवनाच्या इमारतीत भाजपा निषेध आंदोलन करत होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो आपल्या अंगावर पडला आणि डोक्याला जखम झाल्याचा आरोप सारंगी यांनी केला होता. हा मुद्दा आता गुन्हा नोंदवण्यापर्यंत वाढला आहे.

भाजपा ही नटरंगी नार : राऊत.

काल संसदेबाहेर झालेल्या महाभारतावरून आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार सारंगी हे किती नाटकबाज आहेत, हे वेगळं सांगायची गरज आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते ढोंगी असल्याचा पलटवार राऊतांनी केला आहे. भाजपा किती आंबेडकरवादी आहे हे दिसून आल्याचे ते म्हणाले. भाजपाने नाटक वढवल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा ही नटरंगी नार असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात जोरदार आंदोलन

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. भाजपाच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. मविआने हे आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे संसदेबाहेर इंडिया आघाडीने भाजपाविरोधात आंदोलन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles