Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अनुप मोरे तर राहुल लोणीकर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले अनुप मोरे यांचे अभिनंदन, राहुल लोणीकर यांना पुढील वाटचालीस दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सावंतवाडी : दोन वर्ष युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या श्री राहुल लोणीकर यांची नियुक्ती भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री अनुप मोरे यांनी नवीन जबाबदारीची सूत्रे हाती घेतली आहेत. आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश मुख्यालयात या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. हे दोन्ही नेते आपापल्या जबाबदाऱ्या सार्थपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी नूतन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनुपजी मोरे आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री राहुल लोणीकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles