दोडामार्ग : सासोली येथे ‘धी ओरिजीन’ या नावाने परप्रांतीय कंपनीने स्थानीक भूमिपुत्रांच्या जमीनी कवडीमोल दराने खरेदी केलेल्या आहेत मात्र या जमीनी खरेदी करताना सामाईक जमिनींमधील हिस्से परस्पर खरेदी करण्यात आलेले आहेत. सात बारावर नाव असलेल्या जमीनमालकांचे आपापसात वाटप झालेले नसताना महसूल यंत्रणेला हाताशी धरून कंपनीने पैशाच्या जोरावर हि खरेदिखते पूर्ण केली असून सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावणारी महसूल यंत्रणा या कंपनीच्या पूर्णपणे दावणीला बांधली गेली असल्याचे या जमीन व्यवहारांवरून स्पष्ट होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.
एखादी जमीन अक्रूषीत कारणासाठी वापरायची असेल तर त्याची महसूल यंत्रणेमार्फत परवानगी घ्यावी लागते त्यासाठी अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात मात्र या कंपनीला अशी परवानगी देताना तत्कालीन तहसीलदार यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हि परवानगी बेकायदेशीर पणे दिलेली आहॆ हि परवानगी तातडीने रद्द करण्यासाठी मनसे मार्फत लवकरच प्रांताधिकारी यांची भेट घेण्यात येणार आहॆ तसेच या कंपनीने वन हद्दीत अतिक्रमण केले असून अनेक झाडांची बेसुमार तोड केलेली आहॆ यां बाबत देखील संबंधीत कंपनीच्या जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी वनसंरक्षक यांची भेट घेण्यात येणार आहॆ. या गावातील ग्रामस्थांच्या पाठीशी मनसे ठाम पणे उभी राहणार असून या पुढील सर्व आंदोलनामध्ये मनसेचा सक्रिय सहभाग असणार आहॆ असे आश्वासन या वेळी देण्यात आले. या वेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर ,सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत ,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत ,बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी ,सतीश आकेरकर तसेच मनोज गवस,महेश ठाकूर ,दाजी गवस ,विजय ठाकूर ,दिपक गवस ,शुभम गवस ,बाळू देसाई ,आनंद ठाकूर ,दिनेश परब ,संतोष सावंत ,अजित गवस, लक्ष्मण गवस ,संतोष परब ,अनिरुद्ध फाटक ,अनिल परब ,रवींद्र देसाई ,उद्देश बिले, संदेश भुजबळ, बापू सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.