Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

नाट्योत्सवाच्या माध्यमातू‌न वि‌द्यार्थी अभिव्यक्त होतात. – प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर.

सावंतवाडी : शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदु‌र्ग, गटाशक्षणाधिकारी पंचायत समिती सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक वि‌द्यालय, नेमळे यांच्या संयुक्त वि‌द्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२४ सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे नेमळे पंचक्रोशी माध्यमिक वि‌द्यालयात आयोजित करण्यात आली.

प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, उपाशिक्षणाधिकारी श्री. आवटी, गटाशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, तळवडे केंद्राचे केंद्राध्यक्ष प्रमोद‌ पावसकर, प्राचार्या कल्पना बोवलेकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रभु तेंडोलकर, सचिव स. पा. आळवे, मदन राऊळ, प्राचार्या कल्पना बोवलेकर, स्नेहा गावडे, ऋषिकेश गावडे, सातार्डेकर मॅडम, केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर आदी उपस्थित उद्‌घाटन होते.

यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी अभिव्यक्त होतात. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगल्या प्रकारे विकास होतो, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राऊळ म्हणाले, विद्यार्थ्यांनाच्या हिताचे चांगले उपक्रम ही संस्था नेहमीच घ्यायला उत्सुकअसते. वि‌द्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावि‌द्यालयातील विज्ञान विषयाचे उपक्रमशील शिक्षक उमेश राऊळ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नाट्योत्सव स्पर्धेसाठी तालुक्यातील एकूण १८ शाळेने सह‌भाग घेतला.

सकाळी ११ वाजता सुरु झालेली स्पर्धा रात्री ९ वाजता संपली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक – मदरक्विन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी, ‌
द्वितीय क्रमांक – राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी व तृतीय क्रमांक माऊली माध्यमिक वि‌द्यालय, सोनुर्ली यांनी प्राप्त केला.

संस्थेचे अध्यक्ष श्री राऊळ व इतर प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण स्वप्नील गोरे, व अमर प्रभू यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन धामापूरकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles