वेंगुर्ला : पॅरालिंम्पिक स्पोर्टस असोसिएशन , महाराष्ट्र आयोजित पॅरालिंम्पिक चॅम्पियन्सशिप २०२४ ह्या राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंच्या अॅथलेटीक क्रिडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांगावर मात करुन उज्वल यश संपादन केले .तसेच दोन सुवर्ण , एक रौप्य व एक कास्य अशी चार पदके मिळवली .
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करत देवगड येथील दिक्षा तेली हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत गोळा फेक व थाळी फेक या क्रिडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तसेच कुडाळ येथील जोस्पिन डिसोझा हिने थाळी फेक क्रीडा प्रकारात रौप्य पदक व गोळा फेक क्रिडा प्रकारात कास्य पदक मिळवले . याबद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने त्या खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्या खेळाडुंचा सन्मान करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री , सहसंयोजक शामसुंदर लोट , सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार , सुनिल तांबे , प्रकाश वाघ , प्रशांत कदम , आश्विनी पालव , विजय कदम , प्रकाश घाडीगावकर , सुवर्णा वरक , रंजना ईंदुलकर , प्रमिला घाडीगावकर , प्रकाश सावंत , भरत परब इत्यादी दिव्यांग विकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVT –