वेंगुर्ले : तालुक्यातील भाजपा सदस्य अभियान अंतर्गत होडावडे या गावी सदस्यता मोहिमेत सहभागी होत नामदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करीत कार्यकर्त्यांना चांगलेच बळ देत उत्साह वाढवला. तसेच उपस्थित मंडळींना सदस्यता कार्डाचे वाटप करण्यात आले . या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष आणि या अभियानाचे प्रभारी श्री मनिष दळवी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाराम सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शक्तिकेंद्र प्रमुख नितीन परब, होडवडा उपसरपंच राजबा सावंत, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, प्रसाद परब, शंकर घारे यांनी विशेष प्रयत्न केले.
ADVT –