सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता करूळ ग्रंथालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत सदर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत साहित्यिक, सांस्कृतिक कार्य या संदर्भात चर्चा तसेच जिल्हा साहित्य संमेलन नियोजन आदींवर चर्चा होणार आहे. तरी सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाअध्यक्ष मंगेश मसके, सचिव विठ्ठल कदम यांनी केले आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या करूळ या मूळ गावी कित्येक वर्षानंतर बैठक होत आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. कर्णिक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.