वडोदरा : कर्नाटक क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी उंचावली आहे. कर्नाटकाने मयंक अग्रवाल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. कर्नाटकाने विदर्भावर अंतिम सामन्यात 36 धावांनी विजय मिळवलाय. कर्नाटकाने विदर्भाला विजयासाठी 349 धावांचं आव्हान दिलं होतं. विदर्भाने जोरदार प्रत्युत्तर देत 300 पार मजल मारत होती. मात्र कर्नाटकाच्या गोलंदाजांनी विदर्भाला 48.2 ओव्हरमध्ये 312 धावांवर रोखलं आणि विजय मिळवला. या पराभवासह विदर्भाचा कर्णधार करुण नायर याला हा दिवसभरात दुसरा झटका लागला. करुण नायरची आधी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र निवड समितीने त्याला डावललं.
कर्नाटक प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, हार्दिक राज, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक आणि अभिलाष शेट्टी.


