वैभववाडी: भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या विभागांमार्फत वैभववाडीतील महाराणा प्रतापसिंह कलादालन परिसरातील महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा व कलादालन परिसर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसर तसेच एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांचा पुतळा व स्मारक परिसर या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
आपल्या देशातील महान व्यक्तींचे व शहीदांचे स्मरण असावे व त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व समजावे आणि राष्ट्रभक्ती तसेच सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने या उपक्रमाचे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या विभागांच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. चौगुले, डॉ. एस. सी. राडे, आर. ए. भोसले व राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख आर. पी. काशेट्टी यांनी यशस्वीरित्या या उपक्रमाचे आयोजन केले होते.