Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

विषय शौचालय बांधकामाचा, सुरेश रेवाडकरांनी मार्ग पत्करला उपोषणाचा. ; स्वातंत्र्यदिनी आजगाव ग्रामपंचायतसमोर करणार उपोषण.

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील माळ्यारवाडी येथील रहिवासी सुरेश रामा रेवाडकर हे उद्या स्वातंत्र्यदिनी आजगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडणार आहेत. या संदर्भात त्यांनी आपले लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी (ग्रामपंचायत), सरपंच व ग्रामसेवक आजगाव, तसेच पोलीस दुरक्षेत्र, शिरोडा यांना दिले आहे.

दरम्यान,
सुरेश रामा रेवाडकर आपल्या निवेदनात म्हणतात की, गाव मौजे आजगाव, ता. सावंतवाडी येथील सर्व्हे नं १०० हिस्सा नं. ६ भोगवटदार वर्ग २ या जमिनीत आमच्या सामाइक कब्जा भोगाची जमीन असुन त्यात माझ्या हिश्याची २.९३ गुंठे एवढी जमिन असुन ती माझ्या कब्जात व वहिवाटीत आहे. त्यात माझे राहते घर असून त्यात आम्ही तीन माणसे राहतो. आम्हाला स्वच्छ भारत मिशनाअंतर्गत शौचालयाची आवश्यकता असल्यामुळे आम्ही जवळ जवळ ५०० मिटर दूर अंतरावर बांधलेल्या शौचालयाचा आत्तापर्यंत वापर करत होतो. परंतु सद्या माझी तब्येत बरी नसून मला बी.पी डायबिटीसचा त्रास आहे. तसेच माझी सुन ही गरोदर आहे या कारणांमुळे रात्री अपरात्री शौचालयास ५०० मिटर जाणे शक्य नसल्यामुळे मि माझ्या राहत्या घराच्या पडवित नविन शौचालयाचे बांधकाम करण्यास सुरवात केली त्याचवेळी माझा पुतण्या हा माझा शौचालय बांधकाम अडवण्यास आला. कारण त्याने आपली विहीर जवळच आहे असे सांगितले, मि त्याच वेळो ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधला व सर्व वस्तुस्थिती व पाहणी करण्यास सांगितली. तद्नंतर त्यांनी दि.०३/०५/२०२४ रोजी मला नोटीस देऊन सभेस हजर राहण्यास सांगितले. सदर सभेची नोटीससोबत जोडत आहे.

त्यानंतर मी ग्रामपंचायतीकडे विहीरीपासुन शौचालयाचे अंतर किती असावे यांचे सुधारीत परीपत्रकाची मागणी केली परंतु त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. नंतर त्यांनी आरोग्य विभागास पाहणी करणेस सांगितली. त्याप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. व रिपोर्ट पंचायतीत सादर केला. नंतर मी आरोग्य विभाग जि.प. सिंधुदुर्ग यांना अर्ज देऊन सुधारित शासन परिपत्रकाची मागणी केली त्याप्रमाणे दि.१५/०५/२०२४ रोजी त्यांनी सुधारित परिपत्रक मला दिले. त्यात कमीत कमी विहीरीपासुन शौचालय हा ३ मीटर अंतरावर असावा असे स्पष्ट आहे. त्या परिपत्रकाची प्रत या अर्जासोबत जोडत आहे. सद्यस्थितीत माझा शौचालय हा विहीरी पासुन ८ मीटर अंतरावर आहे. ही वस्तुस्थिती आहे त्याची पाहणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेली आहे.

वरील सर्व परिस्थितीचा विचार करता मी दिनांक-१०/०५/२०२४ रोजी ग्रामपंचायतीकडे वरील सर्व बाबीसंदर्भात लेखी अर्ज देऊन उत्तराची वाट पाहत आज पर्यंत राहिलो. परंतू दि.१०/०५/२०२४ ते आंज पर्यंत ग्रामपंचायतीने मला कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर दिलेले नाही हा एक गरीब शेतकरी कुटुंबावर होणारा अन्याय आहे. कारण माझी आरोग्या संदर्भाची माहिती व वय पाहता तसेच कुटुंबात असणारी एक महिला ही सुद्धा गरोदर अशा परिस्थितीत शौचालय हा एक महत्वाचा भाग असून त्या शौचालयाच्या बांधकामा संदर्भात एखाद्या ग्रामपंच्यायतीने कुठच्याही प्रकारचा निर्णय न देणे ही बाब गंभिर स्वरुपारी असून आपल्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य तो न्याय मिळावा ही विनंती.

शासनाच्या जी.आर. (सुधारीत शासन परिपत्रक) प्रमाणे विहिर व शौचालय यामधील अंतर हे ३.०० मीटर असावे त्याप्रमाणे आमचे शौचालय व विहिर यामधोल अंतर हे ८.०० मीटर आहे. असे असताना ग्रामपंचायतीने कोणत्या निकषाच्या आधारे आम्हाला शौचालय बांधकाम थांबविण्याबाबतचे पत्र काढले? शासनाच्या जी. आर. ला काहीच महत्त्व नाही का? सदर बाबत जर आपण मला दहा दिवसात शौचालय बांधकामासंबंधी योग्य तो न्यायनिर्णय न दिल्यास मी स्वच्छ भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत आजगाव कार्यालसमोर कुटुंबियांसमवेत उपोषण करणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles