Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुख्याध्यापक जयवंत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी हर्षाली खानविलकर यांची एकमताने निवड!

सावंतवाडी : विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दाणोली येथील कै. बाबूराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी सावंतवाडी येथील आर्. पी. डी. हायस्कूलच्या हर्षाली खानविलकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
विद्यासेवक सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यासेवक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व पॅनलचे मार्गदर्शक ओमप्रकाश तिवरेकर, जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेचे संचालक समिर परब, प्रदिप सावंत तसेच शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव केंकरे, अनिल जाधव भिवा धुरी यांनी नियोजन केले. या निवड प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आर. आर. आरोंदेकर यांनी काम पाहिले.
विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी हर्षाली खानविलकर यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे माजी अध्यक्ष तथा प्रमुख राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर व सर्व पदाधिकारी, विद्यमान अध्यक्ष प्रशांत आडेलकर, पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष पवन वनवे, उपाध्यक्ष शरद जाधव, सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे, पांडुरंग काकतकर, झरेबांबर येथील कै. बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी
अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles