सावंतवाडी : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत प्रशालेचा विद्यार्थी कु. चिदानंद रेडकर याने प्रथम व द्वितीय स्तरावर गुणवत्ता प्राप्त केली. त्याची निवड तृतीय व चतुर्थ स्तरासाठी झाली आहे. प्रशालेचे प्राचार्य फा. रिचर्ड सालदान्हा यांनी चिदानंदचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी प्रशालेकडून शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ADVT –