चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानचा धमाका! ; दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून गाठली अंतिम फेरी.

कराची : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 353 धावांचं बलाढ्य आव्हान दिलं होतं.खरं तर हे आव्हान पाकिस्तान गाठणार नाही असंच वाटत होतं. पण हे आव्हान पाकिस्तानने 6 गडी आणि 6 चेंडू राखून पूर्ण केलं. पाकिस्तानचा विकेटकीपर आणि कर्णधार मोहम्मद रिझवान याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. नाबाद 122 धावा करत संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. त्याला मधल्या फळीतील सलमान आघाची उत्तम साथ मिळाली. ट्राय सिरीजमध्ये न्यूझीलंडने आधीच अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीचा सामना 14 फेब्रुवारीला होणार असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. आता पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज होणार का? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles