सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला मंडळ, नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्त स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १००३० वाजता नेमळे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर स्पर्धा ही आठवी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी असून ‘स्वा.वि.दा. सावरकरांचे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या विषयासंदर्भात सहा मिनिटे भाषण करायचे आहे. प्रत्येक शाळेने आपल्या निवडक दोन विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठवावे. या स्पर्धेसाठी शुल्क ठेवण्यात आले नाही. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांला १००० रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ७००रुपये व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक ५०० रूपये व प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पाठवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ व प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८३२९४४०६८३ यांच्याशी संपर्क साधावा.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.